कौटुंबिक न्यायालयाने जाणली वेदना, घेतली दखल

 कौटुंबिक न्यायालयाने जाणली वेदना, घेतली दखल
नगर : कुंकवाच्या धन्याने नाकारली ती काही काळात माहेरच्या सावलीलाही परकी होऊ लागली. दाद
मागण्यासाठी कौटुंबिक न्यायालयासमोर सुनावनी सुरु आहे. आता तिच्यापुढे माहेर व सासर अशी दोन्ही दारे बंद
झाल्याने जायचे कुठे. या विवंचनेत एक महिला पक्षकार दि. 0३/१0/२०२० रोजी तारीख संपलेनंतर ती
न्यायालयातून बाहेर गेली व पुन्हा परत येऊन सांयकाळपासून रात्री सुमारे ९ वाजेपर्यंत न्यायालयाचे मुख्य प्रवेश
द्वाराजवळ बसून राहिली. अशावेळी डोळ्यावर पट्टी बांधून निःपक्षपणे न्याय देणाऱ्या न्यायमूर्ती यांनी सदरहू महिलेचे
पालकत्वबाबतचे प्रश्नाचे भूमिकेची दखल घेत महाराष्ट्र कौटुंबिक न्यायालय अधिनियम १९८७, नियम २२ अंतर्गत
सामाजिक संस्थेच्या छताखाली तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विवाह समुपदेशक यांना
सांगितले. या घटनेतून न्यायपलिकडचा संवेदनशीलपणा समोर आला आहे.

एका महिलेचा घटस्फोटासाठी अहमदनगर कौटंबिक न्यायालयात अर्ज दाखल आहे. परंतु लॉकडाऊनमुळे
प्रकरणे प्रलंबित असून त्या महिलेला पतीने घराबाहेर हाकलून दिले होते. ती महिला तारखेला न्यायालयात आली
होती. त्या महिलेच्या पतीने तिला घराबाहेर हाकलून दिल्यामुळे ती आता आई-वडिलांकडे राहत असताना त्यांनीही
तिला निवारा न देता घरी न येण्याचे सांगितले, असे समजले. दोन्हीकडची दारे बंद झाल्यामुळे ती महिला कौटुंबिक
न्यायालयाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत विवंचनेत व दुःखी मनाने रडत बसली होती.
त्या दरम्यान जिल्हा न्यायालयाचे पहारेकरी / शिपाई यांनी कौटुंबिक न्यायालयाचे विवाह समुपदेशक श्रीमती सुषमा
बिडवे यांना भ्रमणध्वनीद्वारे याबाबत सांगितले असता, श्रीमती बिडवे यांनी सदरहू महिलेची विचारपूस केली व त्यानंतर
न्यायाधीश महोदया नेत्रा कंक यांना याबाबत कळवून व मार्गदर्शन घेऊन सामाजिक संस्था असलेले स्नेहालय
यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेस सध्या तात्पुरता निवारा देण्याची विनंती केली व त्यानंतर स्नेहालय यांनी महिला
कर्मचारी मार्फत त्या महिलेस घेऊन जाऊन निवारा दिला. त्यानंतर न्यायाधीश महोदया नेत्रा कंक व विवाह समुपदेश
सुषमा बिडवे यांनी त्या महिलेच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन सामाजिक जाणीव करुन दिली व त्यानंतर
स्नेहालयातून त्या महिलेस तिच्या आई-वडिलांनी आनंदाने घरी घेऊन गेले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post