बनावट नोटा छापण्याचा उद्योग करणारे बापलेक अटकेत

 बनावट नोटा छापण्याचा उद्योग करणारे बापलेक अटकेत

200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त


                                                                                        प्रातिनिधीक छायाचित्र

धुळे: धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावात बनावट नोटांच्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  पोलिसांनी छापा टाकून 200 रुपयांच्या बनावट नोटा छापणार्‍या बापलेकाला ताब्यात घेतले. धुळे स्थानिक गुन्हे शाखेने बनावट नोटांचा कारखाना उघडकीस आणला आहे. पोलिसांनी कळमसरे गावात कारवाई करत एका घरातून नोटा छापण्याचे साहित्य, कॉम्पुटर, प्रिंटर्स तसेच 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक आणि  शिरपूर पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. यावेळी संशयित संतोष बेलदार याने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी लागलीच त्याला ताब्यात घेत अटक केली. यावेळी पोलिसांनी घराची झडती घेतली असता आरोपी संतोष बेलदारचे वडील बेसिनमध्ये बनावट नोटा जाळत असताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याही मुसक्या आवळल्या. बनावट नोटा प्रकरणी चौघां विरोधात शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संतोष बेलदारसह दोघांना अटक केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post