बोल्हेगाव येथे तात्पुरत्या स्वरुपातील पोलिस चौकीला मान्यता

 बोल्हेगाव येथे तात्पुरत्या स्वरुपातील पोलिस चौकीला मान्यता

चोरांवर व गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करावी : नगरसेवक कुमारसिंह वाकळेनगर : बोल्हेगाव-नागापूर परिसराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या परिसरामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. या टुकार मुलांकडून नागरिकांमध्ये दहशत व भितीचे वातावरण परसवण्याचे काम करत आहे. तसेच रात्री अपरात्री दरोडे व भूरट्या चोराचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या चोरांवर व दहशत करण्यावर पोलिसांची वचक असणे गरजेचे आहे. यासाठी बोल्हेगाव परिसरामध्ये तात्पुरत्या स्वरुपात पोलिस चौकीची व गस्तीची मागणी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी शहर पोलिस उपधिक्षक विशाल ढुमे व तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हारुन मुलानी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी पोलिस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपातील पोलिस चौकीला मान्यता दिली असून उद्या जागेची पाहणी केली जाणार आहे. यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक अँड. राजेंद्र कातोरे, रमेश वाकळे, संपत वाटमोडे, संपत वाकळे, सुरज कोलते, सारंग कराळे, सनी वाकळे, आकाश वायकर, दशरत वाकळे, गौतम कापडे, सावळाराम कापडे आदी उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post