विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, पती, सासू, सासरा, नणंद व दिरावर गुन्हा दाखल

 विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, पती, सासू, सासरा, नणंद व दिरावर गुन्हा दाखल
 श्रीगोंदा : १२ एप्रिल २०१५ रोजी दयानंद शिवराम सावंत याचा सोनई (नाथनगर) ता. नेवासा जिल्हा अहमदनगर येथील एका मुलीशी विवाह झाला होता. त्यानंतर त्या मुलीच्या तक्रारीनुसार तिचे लग्न झाल्यापासून चार ते पाच महिने तिला तिच्या सासरच्यानीं योग्य वागणूक दिली. मात्र, त्यानंतर तिचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.

लग्न झाल्यानंतर मुलीच्या माहेरी व स्वतः मुलीला कळाले की, दयानंद शिवराम सावंत याचा पहिला विवाह झाला होता व त्यांनी तो शिंदे कुटुंबापासून लपवून ठेवला होता. सरळ सरळ फसवणूक झाल्याचे शिंदे कुटुंबांच्या निदर्शनास आले. पण झालं गेले विसरून जायचं असा निर्धार करून पीडित मुलीच्या माहेरच्या लोकांनी कौटुंबिक संबंध चांगले ठेवले.

तरीसुद्धा पती दयानंद शिवराम सावंत हा अतिशय दारूडा व्यसनाधिनतेच्या आहारी गेल्यामुळे तो सतत त्रास देत तिच्यावर संशय करीत, नेहमी हनमार करत उपाशी ठेवत होता. तू तक्रार केली. तर, सर्व कुटुंबाला आम्ही जात पंचायतीत बसून जाती बाहेर काढू, तुम्हाला पाच लाख रुपयांचा दंड करू, अशी धमकी मुलीचा सासरा व संपूर्ण कुटुंब देत होते. या विषयी मुलीने दिलेल्या फिर्यादिनुसार पती, सासू, सासरा, दीर, नणंद यांच्यावर भांदवी कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ नुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी कोळपे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post