पत्रकार सुभाष चिंधे यांना पितृशोक

 पत्रकार सुभाष चिंधे यांना पितृशोक
अहमदनगर : उपनगरीय भागातील बोल्हेगाव फाट्याजवळील गणराज कॉलनी येथील रहिवाशी निवृत्ती शंकर चिंधे यांचे सोमवारी पहाटे दोन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 81 वर्षे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अनेक वर्षे त्यांनी सेवा केली. दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक सुभाष चिंधे, प्रकाश चिंधे यांचे ते वडील होत. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. संस्कृतमधील अध्यात्मिक ग्रंथ हे मराठीतून भाषांतर करून भक्तांना सांगत असत. येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post