ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजारांची मदत करावी

 ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजारांची मदत करावी

नगर : महाराष्ट्रासह नगर जिल्ह्यात दि.१३ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे आवश्यक आहे. या परिस्थितीत पाहणी दौरे, अभ्यास अशा गोष्टीत वेळ न दडवता शासनाने प्रति हेक्टरी ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना करावी, अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेने केली आहे. यासाठी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून प्रशासनाला निवेदन दिले.

यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, नगर तालुका अध्यक्ष सोमनाथ घुले, शरद पवार, गणेश नेटके, प्रशांत गवारे, नामदेव पवार, अतुल नेटके आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय छावा संघटना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणार आहे. शासनाने मदत करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा नगर जिल्ह्यासह राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेने दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post