ही तर भाजपसाठी चिंतनाची बाब...

 ही तर भाजपसाठी चिंतनाची बाब...

खडसेंच्या पक्षत्यागावर ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे मतमुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घोषणेनंतर भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी खडसेंना या निर्णयाचा पश्चाताप होईल अशी प्रतिक्रिया दिली असताना भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही खडसेंच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देणं ही बातमी धक्कादायक आहे. भाजपसाठी ही चिंतनाची बाब आहे,’ असं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे. मी खडसेंच्या नेतृत्वाखाली काम केलं असल्यानं त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये असं मला वाटत होतं. आता ते गेले असले तरी शक्य झाल्यास त्यांनी निर्णय बदलावा व परत यावं, असं म्हणत, ’वो जानेवाले हो सके तो लौट के आना’ अशी सादही मुनगंटीवार यांनी घातली. ’अर्थात, लोकशाहीमध्ये निर्णयाचा अधिकार सर्वांना असतो. तो त्यांनी घेतला. एक चांगला नेता, ज्यांनी संघटनेवर प्रेम केलं, पक्ष वाढवला. ते एखाद्या नाराजीतून जात असतील तर आमच्यासाठी चिंतनाची बाब आहे,’ असं ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post