‘तोपर्यंत’ कर्जत जामखेडमध्ये कसलाही सत्कार स्विकारणार नाही

 


‘तोपर्यंत’ कर्जत जामखेडमध्ये कसलाही सत्कार स्विकारणार नाही

आ.रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचा मोठा संकल्प
जामखेड : जोपर्यंत कर्जत जामखेड ही शहरे स्वच्छता अभियानात पहिल्या पाचमध्ये येत नाहीत. तोपर्यंत मी कसलाही सत्कार स्विकारणार नाही, सन्मान घेणार नाही. माझा हा संकल्प चांगल्या कामासाठी आहे, असे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सांगितले.

   कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्यांनी मतदार संघात प्रभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे व सर्वाचे मतपरिवर्तन करत आहेत. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. शहरातील एनसीसीचे सहकार्य घेण्यासाठी ल. ना. होशिंग विद्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, प्राचार्य श्रीकांत होशिंग, हरीभाऊ ढवळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्जत जामखेड मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या असून जातीने या दोन्ही शहरातील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेवून संवाद साधून स्वच्छते संदर्भात जागृती करत आहेत.केवळ जागृतीच नाही तर सुनंदा पवार स्वतः हातात खोरे-टिकाव घेवून अधिकार्‍यांसोबत श्रमदान करताना दिसत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post