लाच प्रकरणी कृषी विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात

 लाच प्रकरणी कृषी विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यातअहमदनगर : सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सुरु होण्यासाठी कागदपत्रे लवकर देण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच स्विकारणारा राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक रामेश्वर काशिनाथ बाचकर (वय 50) याला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. दि.21 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पेलिस निरीक्षक दीपक करांडे यांचय नेतृत्त्वाखाली सापळा रचून ही कावरवाई केली. राहुरीतील तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानं पेन्शन सुरु होण्यासाठी त्यांना कागदपत्रांची आवश्यक होती. ही कागदपत्रे देण्यासाठी बाचकर यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यावर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीने सापळा रचून पाच हजारांची लाच घेताना बाचकर याला पंचासमक्ष ताब्यात घेतलं. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक करांडे, पोलि निरीक्षक शाम पवरे यांच्या टिमने ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post