तुम्ही खडसेंच्या संपर्कात आहात का?, माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंचा मोठा खुलासा
नगर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासमवेत भाजपचे आणखी काही माजी आमदार राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याची चर्चा होत आहे. याबाबत नगरमधील दिग्गज माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. कर्डिले म्हणाले की, खडसे यांच्या पक्षांतरामुळे भाजपला काही प्रमाणात फटका बसणार असला तरी पक्ष मजबूत आहे. मी स्वत: मात्र त्यांच्या कोणत्याही संपर्कात नाही. माझे राजकारण भाजपतच चालणार असून शेवटही भाजपमध्येच होईल. त्यामुळे काळजीचे कोणतेही कारण नाही, असे सांगत कर्डिले यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीविषयीची भूमिका स्पष्ट केली. नगर तालुक्यात जामखेड राष्ट्रीय महामार्ग भूमीपूजन कार्यक्रमावेळी माजी मंत्री कर्डिले यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या पक्षांतराच्या शक्यतेचा स्पष्ट इन्कार केला.
Post a Comment