राठोड यांची व्हायरल क्लिप व बनावट डिझेल प्रकरणाचाही सोक्षमोक्ष लावावा

 राठोड यांची व्हायरल क्लिप व बनावट डिझेल प्रकरणाचाही सोक्षमोक्ष लावावा

सामाजिक कार्यकर्ते ऍड.श्याम आसावा यांची मागणीनगर : अतीरिक्त पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांना निलंबित करूनच वायरल क्लीप व बनावट डिझेल प्रकरणाचा सोक्षमोक्ष लवकरात लवकर लागणे आवश्यक, असे मत सामाजिक कार्यकर्ते ऍड.श्याम आसावा यांनी व्यक्त केले आहे. प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात ऍड.आसावा यांनी म्हटले आहे की, वायरल झालेली क्लीप ही वरीष्ठांनी ऐकलीच नाही यावर विश्वास ठेवला जावु शकत नाही. कुणालाही ही क्लीप काय आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता वाटत नाही म्हणजे हात झटकण्याचा प्रकार आहे. अधिकारी धडाकेबाज कारवाई करतो म्हणुन त्याला अडकविण्यासाठी जर गुन्हेगार असे कटकारस्थान करतात ही गोष्ट तर पटत नाही आणि खरे असले तर खरच गुन्हेगार ईतके पोलीस दलास वरचढ झाले आहे का?. खर तर आधी अवैध व्यवसायिकांवर कारवाया करुन धाक निर्माण करायचा. जेणेकरुन अवैध व्यवसायीक घाबरुन तो अधिकारी मागेल तितका हफ्ता देण्यास तयार होतो ही कार्यपद्धती काही नवी नाही.

या अधिकार्‍यावर बदली ही कारवाई होवु शकत नाही. तर त्याला तातडीने निलंबित करुन लवकरात लवकर तपास झाला पाहिजे. गर्जे व राठोड यांचे कॉल डिटेल्स व आवाजाचे नमुने घेत सत्य समोर आणले गेले पाहीजे. शिवाय डिझेल प्रकरणातील कारवाईही याच राठोड यांच्या उपस्थितीत झालेली आहे. काल यात काही कर्मचारीवर निलंबनाची कारवाई घाईघाईत करण्यात आली. त्यांना चौकशी चालु असतांना निलंबित करणे व वरीष्ठ अधिकारयाची बदली करणे हा समान न्याय नसुन विसंगती आहे.

कनिष्ठ कर्मचारी वरीष्ठांच्या मर्जी विरुद्ध वागतील अशी शक्यता कमी आहे. शिवाय कनिष्ठांचा बळीचा बकरा बनवुन बळी देण्याचा पायंडाही मोडीत काढणे गरजेचे आहे. यामुळे कनिष्ठ पोलीस कर्मचारीवर अन्याय होतो व त्यांची मानसिकताही खालावते, असेही ऍड.आसावा यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post