अपघातग्रस्त अनोळखी वृध्देसाठी "विघ्नहर्ता'' हॉस्पिटल ठरले "सुखकर्ता"

 अपघातग्रस्त अनोळखी वृध्द महिलेवर यशस्वी उपचार करीत दिले जीवनदान नगर : अनोळखी वृद्ध महिलेवर विघ्नहर्ता हॉस्पिटलने उपचार करून समाजामध्ये संवेदनशीलता दाखविली. डॉ.महेश वीर हे नेहमीच समाजातील गरीब व गरजू रुग्णांवर मानवतेच्या भावनेतून उपचार करीत असल्यामुळे ते ठरले देवदूत. डॉक्टर हे समाजामध्ये वेदनामुक्तीचे काम करत असतात. त्यामुळेच डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधिले जाते. दि.१८-१0-२०0२० रोजी पांढरीपूल येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या वयोवृद्ध महिलेवर उपचाराचे दायित्व विघ्नहर्ता हॉस्पिटलने घेऊन संवेदनशीलतेचा परिचय दिला.

 ही वयोवृद्ध महिला आजारातून सावरली असून तिला अद्याप आपली ओळख सांगता येत नाही. या घटनेतून डॉक्टरांतील देवदूताचा धर्म अधोरेखित झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. १८-१0-२0०२0 रोजी सायंकाली ६ वाजता पांढरीपूल शिवारात पारस दूध फॅक्टरीसमोरील रस्त्यावरील अपघतामध्ये अनोळखी महिला गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. एका व्यक्तीने बेशुद्ध अवस्थेतील अनोळखी महिलेस नगर येथील विघ्नहर्ता सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. येथील डॉक्टर व स्टाफ यांनी या महिलेस तातडीने उपचार देण्यास सुरुवात केली. गेली सात दिवस तिला आयसीयूमध्ये उपचार दिल्यानंतर ती महिला शुद्धीवर आली आहे. आता ती धोक्याच्या बाहेर आहे. तरी या परिस्थितीमध्ये ती काही बोलत नसून तिच्या स्मरण शक्तीवर परिणाम झालेला आहे. ती स्वतःचे नाव, गाव व पत्ता तसेच नातेवाईकांची माहिती सांगू शकत नाही. तरी विघ्नहर्ताचे संचालकांनी अनेक ठिकाणी पोलिसांशी व नागरिकांशी संपर्क साधूनही तिची ओळख पटलेली नाही. तरी आपणा सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांची ओळख पटवून देण्यास मदत करावी, अशी माहिती विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेश वीर यांनी दिली. यावेळी डॉ. अखिलेश धानोरकर, डॉ. अमित कुलांगे, डॉ. सुप्रिया वीर, डॉ. निलोफर धानोरकर, डॉ. प्राजक्ता पारधे, डॉ. प्रशांत जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post