देवेंद्र फडणवीस यांना करोनाची बाधा, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन

 देवेंद्र फडणवीस यांना करोनाची बाधा, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहनमुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: व्टिटवर याबाबतची माहिती दिली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. फडणवीस यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्‌यानुसार औषधोपचार घेतो आहे. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post