'ईडी' लावली तर मी 'सिडी' लावेल,

 'ईडी' लावली तर मी 'सिडी' लावेल, 

भाजपला इशारा देत एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेशमुंबई : एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंसोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.


 या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

खडसे म्हणाले, मी माझ्या वरील अन्यायाबाबत जेव्हा दिल्लीतील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानी तुम्हाला भाजपत भविष्य नसल्याचे सांगत मला त्यांच्या कडूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करा असा सल्ला दिला. येथल्या काळात अनेकांची पोलखोल करू, भूखंड कोणी कसे लाटले हे जाहीर करू. ज्या निष्ठेने भाजप चे काम केले. त्याच निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करू. ईडीची भिती दाखवली तर मी सिडी दाखवेल असा इशारा खडसेंनी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post