भाजप सोडण्याचा एकनाथ खडसेंना पश्चातापच होईल...
माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांची प्रतिक्रिया
अहमदनगर: भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा देवून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी या निर्णयाचा खडसेंना निश्चितच पश्चाताप होईल अशी टिका केली आहे. प्रा.शिंदे म्हणाले की, एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये जी किंमत होती, ती राष्ट्रवादीत त्यांना कधीही मिळणार नाही. खडसे यांच्यासोबत लोकमतातील कोणताही प्रचलित नेता जाणार नाही. कोणीही एवढे धैर्य दाखवणार नाही. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विस्तार होताना दिसतोय,म्हणून आता खडसे यांनी राष्ट्रवादीत जाण्याची जी हिंमत केली, त्यांचा आगामी काळात त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.
Post a Comment