गुड न्यूज...महाबळेश्वरमध्ये पर्यटनास सशर्त परवानगी

 गुड न्यूज...महाबळेश्वरमध्ये पर्यटनास सशर्त परवानगीसातारा : मिनी काश्मीर अशी ओळख असणार्‍या महाबळेश्वरमध्ये पर्यटनास परवानगी देण्यात आली आहे. अनलॉक प्रक्रिये अंतर्गत सातारा जिल्हाधिकार्‍यांनी तसे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाचगणी, वेण्णा लेक येथील नौका विहार, घोडेस्वारी आणि टॅक्सी व्यवसाय सुरु होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने काही नियमावलीही जाहीर केली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाने पर्यटनास सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार काही अटी घालण्यात आल्या आहेत. घोडेस्वारीसाठी वापरण्यात येणार्‍या घोड्यांची वैद्यकीय चाचणी करणे बंधनकारक आहे. तसेच व्यवसाय सुरु करण्यापूर्वी घोडेचालक आणि मालक या दोघांची कोरोना चाचणी केलेली असने गरजे आहे. वेण्णा येथे नौकाविहार करायचे असल्यास एका बोटीत 6 पर्यटक आणि 1 घोडेस्वार असे एकूण सात जणच बसू शकतील. तसेच  बोट सॅनिटाईझ करणे बंधनकारक असेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post