महिलांनी चोरल्या नवीन सहावारी साड्या
नगर : शेवगावमधील श्रीराम कॉलनीत फिर्यादी राणी बलवंत देशमुख (वय 30) यांच्या राहत्या घरातील दुकानातून अज्ञात तीन महिलांनी 14 नवीन सहावारी साड्या लंपास केल्या आहेत. दि.20 सप्टेंबर रोजी ही चोरीची घटना घडली असून आरोपी 3 महिलांनी सुमारे 16 हजारांच्या साड्या चोरुन नेल्याची फिर्याद देशमुख यांनी दिली आहे. त्यानुसार शेवगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Post a Comment