चास शिवारात ट्रकचालकाला लुटले, क्लिनर जखमी

 


चास शिवारात ट्रकचालकाला लुटले, क्लिनर जखमीनगर : नगर पुणे महामार्गावरील चास शिवारात पटणा (बिहार) येथून पुण्याला माल वाहतूक करणारा ट्रक मध्यरात्री थांबलेला असताना तिघा जणांनी ट्रकच्या केबिनमध्ये झोपलेला चालक व त्याचा सहायक यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत 6 हजार रुपयांची रोख रक्कम व फिर्यादीचा मोबाईल चोरुन नेला. दि. 30 सप्टेंबर रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मनिष कुमार योगींदर यादव (रा.जि.सारण, राज्य बिहार) याच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींचा अल्बम दाखवला असता फिर्यादीने तिघांना ओळखले आहे. त्यानुसार आत्मशा सावत्या भोसले, रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले (सर्व रा.पिंपळगाव कोडा, ता.नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सपोनि राजपूत यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. अधिक पोसई जारवाल करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post