पाथर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवली

 ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना मदत करा

पाथर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवलीनगर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेवगाव, पाथर्डी तालुक्याच्या दौर्‍यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भाजपच्या नाराजीचा सामना करावा लागला. पाथर्डीत भाजप कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी करीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. पाथर्डी पंचायत समितीसमोर भाजपनं पालकमंत्र्यांची गाडी अडवली व ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना भरीव मदत करण्याची मागणी केली. यावेळी विष्णुपंत अकोलकर, गोकुळ दौंड, सुनिल ओहोळ, रवींद्र वायकर, काकासाहेब शिंदे, सुभाष केकाण, उध्दव माने, बाबा राजगुरु आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी गाडीतून उतरुन भाजपचे निवेदन स्विकारले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post