जळगाव पाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातूनही भाजपमधून राष्ट्रवादीत आऊटगोईंग

 जळगाव पाठोपाठ ‘या’ जिल्ह्यातूनही भाजपमधून राष्ट्रवादीत आऊटगोईंगमुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आ. अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत प्रवेश केला. 

धुळे जिल्ह्यातील भरत पाटील, भास्कर पाटील, अनंतराव पाटील, बाळू पाटील, कपिल दामोदर, माजी संस्थापक जिल्हाध्यक्ष  चंद्रशेखर पाटील, शहर उपाध्यक्ष दिलीप पाटील, राजेंद्र गायकवाड यांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष विजय वाघ, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, संयोजक प्रशांत भदाणे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post