नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नाशिक व औरंगाबादहून दोन टिम येणार

 नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नाशिक व औरंगाबादहून दोन टिम येणार

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची माहिती, शिरापूर येथे दिली भेटनगर : पाथर्डी तालुक्यात धुमाकुळ घालणार्‍या नरभक्षक बिबट्याला ताबडतोब जेरबंद करण्यासाठी नाशिक आणि औरंगाबादहून दोन टीम बोलावून घेतल्या आहेत. सर्व साधनसामुग्रीयुक्त या टीम लगेचच ट्रेसिंग प्रक्रिया सुरू करतील. बिबट्याला पकडण्याचे कार्य युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येईल, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे. याबाबत तनपुरे यांनी व्टिटक करून माहिती दिली. काल रात्री पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे बिबट्याने एका साडेतीन वर्षाच्या लेकराला आईच्या हातातून हिसकावून जंगलात नेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ही हृदयद्रावक घटना ऐकल्यावर तनपुरे यांनी तातडीने मतदारसंघात पोहोचताच लगेचच बुधवंत कुटुंबियांची भेट घेतली. पोटचं लेकरू गेल्याची भावना काय असते हे विचारांच्या पलीकडे आहे. त्या माऊलीला आणि बुधवंत कुटुंबियांना हे दुःख पचविण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना. या कुटुंबाला शासनस्तरावर तात्काळ मदत व्हावी यासाठी मी प्रयत्नशील आहे, असेही तनपुरे यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post