छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे : खा. सुजय विखे

 छावणी परिषदेचा कायदा रद्द झाला पाहिजे : खा. सुजय विखे पाटील

भिंगार शहरात प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना शिफारसपत्राचे वाटपनगर : देशामध्ये आपलेच ऐकले जाते, या भावनेतून राज्यातील काही नेते विविध प्रश्नांचे निवेदन घेऊन जातात व समाजामध्ये गैरसमज निर्माण करुन देण्याचे काम केले जाते. खोटे बोलणारे लोक आपल्या राज्यातही आहेत. परंतु जनता आता हशार झाली आहे. काम करणार्‍याच्या पाठीमागे जनता उभी राहते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या योजना गरीबांपर्यंत पोहचविण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. छावणी परिषदेच्या कायद्यामुळे विकास कामे करताना विविध अडचणी येत असतात. यासाठी हा कायदा रद्द झाला पाहिजे. ही प्रक्रिया देशामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु आहे. आज देशामध्ये नरेंद्र मोदींचे नेतृत्व नसते तर कोरोनामध्ये मोठ्याप्रमाणात मृत्यूचे प्रमाण वाढले असते. यासाठी देशाला सुरुक्षित ठेवण्याचे काम नरेंद्र मोदीच करु शकतात, असे प्रतिपादन खा. सुजय विखे पाटील यांनी केले.

भिंगार छावणी परिषदेच्यावतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना शिफारसपत्र वाटप करताना खा. सुजय विखे. समवेत माजी खा. दिलीप गांधी, सीओ विद्याधर पवार, ए.पी.आय. प्रविण पाटील, भाजपा शहराध्यक्ष वसंत राठोड, छावणी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश फुलारी, नगरसेविका शुभांगी साठे, शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी दहिहंडे, संजय छजलाणी, रवींद्र लालबेंद्रे, किशोर कटोरे, वैशाली कटोरे, गणेश साठे, महेश नामदे, महेश झोडगे, सुरेश मेहतानी, कमलेश धर्माधिकारी, सचिन दरेकर, ब्रिजेश लाड, लक्ष्मीकांत तिवारी आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना खा. विखे म्हणाले की, छावणी परिषदेने 00 पासून घरपट्टीमध्ये वाढ केली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना घरपट्टी भरणे शक्य नाही. यासाठी ती रद्द करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

यावेळी माजी खा. दिलीप गांधी म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वात जास्त त्रास पथविक्रेत्यांना झाला आहे. स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वनिधी योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज देण्याचे जाहीर केले आहे. आता तुम्ही रस्त्यावर व्यवसाय करतात, पुढे तुम्ही स्वतःच्या दुकानात हा व्यवसाय करु शकतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post