अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

अमित राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल


 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. थोडा ताप असल्यामुळे खबरदारी म्हणून अमित ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काळजीचं कुठलंही कारण नाही, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कोविड चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. याशिवाय, त्यांचा मलेरिया चाचणीचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post