काळजी नको, सर्व देशवासियांना करोनाची लस मिळणार

 काळजी नको, सर्व देशवासियांना करोनाची लस मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आश्वस्तनवी दिल्ली : देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार असं आश्वासन आता पंतप्रधान मोदींनी दिलं आहे. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या लशींची मानवी चाचणी सध्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुरू होत आहे. येत्या काही महिन्यांत ही लस बाजारात उपलब्ध होईल आणि टप्प्या-टप्प्यानं सर्व नागरिकांपर्यंत ही लस पोहोचवण्यात येईल. यासाठी विशेष योजना देखील तयार केल्या जात आहेत. लस आल्यानंतर सर्वप्रथम हेल्थवर्करना प्राधान्याने लस देण्यात येणार असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितलं.

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना साथीच्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या वेगात झालेल्या सुधारणात्मक पावलांमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. जगातील देश आता भारताच्या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. अनेक देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी तयार आहेत. योग्य वेळेत लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांचे प्राण वाचू शकले. आता पुन्हा एकदा भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. 2024 पर्यंत ही अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर नेण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post