अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला
मुंबई : हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मालवी मल्होत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर मालवी मल्होत्रावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहे. काल रात्री मालवी मल्होत्रावर तिच्याच एका मित्राने जीवघेणा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मालवी मल्होत्राच्या शरीरावर तीन वार करण्यात आले आहेत. मालवी मल्होत्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
Post a Comment