दक्षता जनजागृती सप्ताहास जिल्ह्यात प्रारंभ

 दक्षता जनजागृती सप्ताहास जिल्ह्यात प्रारंभ

लाचलुचपत प्रकरणी तक्रारी कराव्यात, आवाहन 



            अहमदनगर, दि. २८-  राज्यात दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक ३१ ऑक्टोबर या जन्मदिवसानिमित्त एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्हयात दिनांक २७ ऑक्टोबरपासून या सप्ताहास सुरुवात झाली. हा सप्ताह ०२ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून सतर्क भारत, समर्थ भारत ही या सप्ताहाची संकल्पना आहे. यानिमित्त काल (मंगळवारी) विविध शासकीय कार्यालयात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आले.

            दरम्यान, लाचलुचपत प्रकरणी नागरिकांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर त्यांनी त्या पोलीस उपअधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टी.व्ही. सेंटरसमोर, सावेडी, अहमदनगर येथे कराव्यात, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.

            दरम्यान, प्रत्येक कार्यालयात या सत्यनिष्ठा प्रतिज्ञेचे वाचन करण्याच्या सूचना राज्य  शासनाने दिल्या. त्यानुसार, या सप्ताह कालावधीत, 'आपल्या देशाची आर्थिक, राजनितीक आणि समाजिक प्रगतीमध्ये भ्रष्टाचार हा मोठा अडथळा आहे असा माझा विश्वास आहे. या भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सर्व भागधारक जसे की सरकार, नागरिक आणि खाजगी क्षेत्र यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. यावर माझा विश्वास आहेप्रत्येक नागरिकाने सावध राहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या उच्चतम मानकांबाबत वचनबध्द असायला हवे आणि भ्रष्टाचाराविरुध्दच्या लढ्यात साथ द्यायला पाहिजे.अंतत: मी शपथ घेतो की, जीवनाच्या सर्व क्षेत्रात आणि कायद्याच्या नियमांचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कार्ये प्रामाणिक आणि पारदर्शीपणे करेन, जनहितामध्ये कार्य करेन,व्यक्तिगत वागणूकीत प्रमाणिकपणा दाखवून उदाहरण प्रस्तुत करेन, भ्रष्टाचाराची कोणत्याही घटनेची माहिती योग्य एजन्सीला देईल,' या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.

            दरम्यान, यावेळी राज्यपाल महोदयांच्या संदेशाचेही वाचन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्या संदेशात, नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या दरम्यान विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post