नगर तालुक्याच्या 'या' ॠणातुन कधीच मुक्त होऊ शकत नाही

 नगर तालुका हा राष्ट्रवादी विचारांचाच - घनश्याम शेलारनगर तालुका प्रतिनिधी- २०१९ च्या विधान सभेत मला ऐनवेळी उमेदवारी मिळाली. नगर तालुक्यातील जनतेपर्यंत मी पोहचूही शकलो नाही पण नगर तालुक्याने माझ्या झोळीत भरभरून मतदान टाकले त्यांचे हे माझ्यावर उपकार असून त्या ऋणातून मी मुक्त होऊ शकणार नाही.श्रीगोंदा, पारनेर आणि राहुरी मतदार संघाला जोडणाऱ्या गावांतून राष्ट्रवादी ला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले कारण नगर तालुका हा शरद पवार आणि राष्ट्रवादी लाच मानणारा आहे  अशी भावना राष्ट्रवादी चे राज्य उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केले.

अहमदनगर मधील राष्ट्रवादी भवन या पक्ष कार्यालयात ते पत्रकारांशी अनौपचारिक  बोलत होते.यावेळी बोलताना शेलार म्हणाले की, नगर तालुका हा शरद पवार यांच्या विचारांना मानणारा आहे.त्यामुळे राहुरी, पारनेर आणि श्रीगोंदा मतदार संघाला जोडणाऱ्या गावांमधून राष्ट्रवादी ला जनतेने भरभरून मतदान केले.मला तर श्रीगोंदा मध्ये ऐनवेळी उमेदवारी मिळाली.नगर तालुक्यातील गावागावात मी पोहचूही शकलो नाही.कोणतीही मोठी सभा घेता आली नाही पण आदरणीय पवार साहेब यांचे विचार आणि माझे स्वच्छ चारित्र्य आणि राजकीय संघर्ष पाहून नगर तालुक्यातील जनतेने मला भरभरून मतदान केले.त्यांचे हे माझ्यावर अनंत उपकार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मी नगर तालुक्यातील जनतेच्या सुख दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे.पण येथून पुढे दर मंगळवारी मी राष्ट्रवादी भवनात उपस्थित राहून नगर तालुक्यातील जनतेची कामे मार्गी लावणार आहे.जनतेने कधीही मला फोन करावा मी सदैव त्यांच्यासाठी हजर असणार आहे.नगर तालुक्यातील गावागावात राष्ट्रवादी चे विचार रुजविण्यासाठी आपण यापुढे प्रयत्नशील असणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी चे नेते किसनराव लोटके, जिल्हा सरचिटणीस केशव बेरड आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post