शिवसेनेतील 'त्या' प्रकरणावरून जय भगवान महासंघाची नाराजी

 शिवसेनेतील 'त्या' प्रकरणावरून जय भगवान महासंघाची नाराजी

वंजारी समाजाचा अवमान सहन करणार नसल्याचा इशाराअहमदनगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या पक्षांतर्गत बैठकित पक्षाचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांना मारण्याची व वंजारी समाजाबद्दल जातीवाचक शब्द वापरल्याबद्दल जय भगवान महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. तर सदर प्रकरणी शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे यासंबंधी तक्रार करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

शिवसेनेच्या पक्षांर्तगत वादाशी काही देणे घेणे नसून, शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्याने वंजारी समाजाचा बंदोबस्त करु असे वादग्रस्त वक्तव्य करुन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पध्दतीने संपुर्ण समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्‍या सदर कार्यकर्त्यास पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी जय भगवान महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. तर वंजारी समाज कोणाच्या धमकीला घाबरत नसून, वंजारी समाजाला कोणी कमी लेखू नये. वंजारी समाजबांधव कोणत्याही समाजाचा अनादर करीत नसून, या समाजाचा कोणी अनादर करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. जय भगवान महासंघ सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी सामाजिक कार्य करीत आहे. वंजारी समाजाला धमकी दिल्याने संपुर्ण समाजाची मानहानी झालेली आहे. शिवसेनेचे नेते व पदाधिकार्‍यांनी अशा जातीयवादी व्यक्तीला पाठिशी न घालता त्याच्यावर कारवाई करण्याचे म्हंटले आहे. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटण्याचा इशारा देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post