लग्नास नकार दिल्याने प्रियसीचा खून, प्रियकराला आजन्म कारावासाची शिक्षा

 

लग्नास नकार दिल्याने प्रियसीचा खून, प्रियकराला आजन्म कारावासाची शिक्षा
अहमदनगर :- लग्नास सतत नकार देत असल्याने अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी प्रदिप माणिक कणसे, ( २४ वर्ष, रा. मु.पो. तळणी, ना. रेणापूर, जि. लातूर) या आरोपीस भा.द.वि.वा.क. ३०२ नुसार दोषी ठरवत  आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५००/-रु. दंड ठोठावण्यात आला.मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आणेकर साहेब यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम १२ नुसार दोषी धरले. सदर घटना २७ हे २०१६ रोजी नगरमधील बुरुडगाव रोडवरील जुन्या जकात नाका परिसरात घडली होती. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता श्री.सतिश के. पाटील यांनी काम पाहिले.

सदर घटनेची थोडक्यात हकिकत अशी की,दि. २७/०५/२०१६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास अहमदनगर शहरातीन जूना जकात नाक्याजवळ, बुरुडगावरोड, अहमदनगर येथिल रामकृष्ण बाबुराव आठरे यांचे आठरे निवासस्थान येथे छतावर घडली. मयत कु. मोहिणी तान्हाजी

सुर्यवंशी, (मूळ रा. हदगा, ता. निलंगा, जि. लातूर) ही घटना घडली त्यावेळी  बुरुडगाव रोड येथे आठरे निवासात तिचे मावस काका तिर्थप्रसाद ज्ञानोबा अनंतवाड यांचेकडे सुटीस आलेली होती. आरोपी हा मयत मोहिणी हिच्याबरोबर लग्न करण्याकरीता गावी तिला तिच्या घरी जावून वारंवार त्रास देत होता. घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी हा नगरला मुक्कामी मित्रांसोबत आला व चेतना लॉजवर मुक्काम केला. दिनांक २७/०५/२०१६ रोजी गंज बाजारातील हार्डवेयर दुकानातुन ऊस तोडण्याचा कोयता खरेदी केला. त्यानंतर पुणा मशिन धार केंद्र येथे कोयत्याला धार लावून घेतली व दुकानातुन पिशवी खरेदी केली.  त्यामध्ये कोयता ठेवून आठरे निवास, बुरुडगाव रोड येथे  वरच्या मजल्यावरएकटाच गेला. मोहिणी छतावर एकटीच असताना तिने लग्नास नकार दिला. या कारणावरून आरोपीन मोहिनीच्या अंगावर कोयत्याने गंभीर स्वरूपाचे अनेक वार केले. त्यामध्ये ती जागेवर मयत झाली.

सदर प्रकरणाबाबत कोतवाली पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होवून पोनि विनोद चव्हाण त्यानंतर डी.वाय.एस.पी. बजरंग बनसोडे यांनी तपास केला.  सदर प्रकरणातील मयत मोहिणी ही तिचा खून झाला त्यावेळी १७ वर्ष वर्षाची होती.

सदरच्या खटल्यात मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आणेकर साहेब यांनी आरोपीस भा.द.वि.का.क. ३०२ नुसार,आजन्म कारावासाची शिक्षा व रक्कम रुपये ५००/- दंड ठोठावला.सदरच्या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने १९साक्षीदार तपासण्यात आले. 

न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तीवाद असलेले साक्षी पुरावा व निवाडे ग्राहय धरून आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.

सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता श्री. सतिश के. पाटील यांनी काम पाहिले व त्यांना पैरवी अधिकारी सफा. एल. एम.काशिद व पोहेका  बी.बी. यांदल, पोलीस मुख्यालय, अहमदनगर यांनी सहाय्य केले.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post