झेंडीगेट येथील अवैध गोमांस विक्रीवर छापा

 

झेंडीगेट येथील अवैध गोमांस विक्रीवर छापानगर : प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ दत्ताराम राठोड यांना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील झेंडीगेट भागात गोहत्या करुन अवैधपणे गोमांस विक्री होत असल्याचे माहीती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. कोतवाली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पवार व  प्रभारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे विशेष पथकातील पोहेकॉ गणेश डहाळे, भरत डंगोरे, पोलीस नाईक घुले व धामणे तसेच पोकॉ दिलीप गायकवाड यांनी अहमदनगर शहरातील झेंडीगेट परीसरात छापा टाकून गोमांस विक्री करणारे दुकानातून दोनशे ऐंशी कीलो गोमांस व गोमांस विक्री करीता लागणारी हत्यारे व साधनांसह सुमारे ४१,०८०/- रु किमतीचे मुद्देमालासह आरोपी  नावेद सादीक कुरेशी व मोसीन सादीक कुरेशी यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. १ ६०७४/२०२० भा. द. वि. कलम २६९ व महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम ५ (क), ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post