विशेष पथकाची मटका अड्ड्यांवर कारवाई, 5 जणांवर गुन्हा दाखल

 विशेष पथकाची मटका अड्ड्यांवर कारवाई, 5 जणांवर गुन्हा दाखल

                                                प्रातिनिधीक फोटो

नगर : प्रभारी पोलीस अधीक्षक अहमदनगर  डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकानेएमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदा कल्याण मटका चालवणार्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी सुभाष वामन थोरात (वय ४० वर्षे रा. रेणुका नगर अहमदनगर), प्रशांत सुरेश झावरे (वय ३० वर्षे रा. साईनगर बोल्हेगाव),(मालक)- बजरंग मामा (फरार) यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कडून ११हजार २७०/- रु. रोख मिळुण आले आहे.

 विशेष पथकातील पोसई एस. एच. सुर्यवंशी, पोना. अरविंद भिंगारदिवे, पोकॉ. राजु चव्हान, पोकॉ. संभाजी घोडे, पोकॉ. विनोद पवार, पोकॉ.दिलीप गायकवाड यांनी ही कारवाई केली.  विशेष पथकाने आणखी एका छाप्यात  नदिम इब्राहिम शेख( वय ३५ वर्षे रा. जिल्हा परीषदशाळेसमोर, सह्याद्री चौक, एमआयडीसी. अहमदनगर ), मालक. - निलेश भाकरे (फरार) यांच्या वरही मटका प्रकरणी कारवाई केली. त्यांच्या कडून १,४२०/- रु. रोख मिळुण आले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post