सौरभ कुमार अग्रवाल नगरचे नुतन अप्पर पोलिस अधीक्षक,

 सौरभ कुमार अग्रवाल नगरचे नुतन अप्पर पोलिस अधीक्षक, 

पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपूरला नियुक्तीनगर ,: नगरचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांची अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जळगाव येथून सौरभ कुमार अग्रवाल यांची नगरला अप्पर पोलिस अधीक्षक पदी बदली झाली आहे. राठोड यांनी काही दिवसांपूर्वीच नगरचा पदभार स्वीकारला होता. 

नियुक्ती प्रतिक्षेत असलेले पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी पदी नियुक्ती मिळाली आहे. श्रीरामपूर चे पोलिस उपअधीक्षक राहुल मदने यांची संगमनेर उपविभागात तर संगमनेरचे पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित यांची नगरला मुख्यालयात पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. गृह विभागाने या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post