मंत्री शंकरराव गडाख पोहोचले शेतकर्यांच्या बांधावर

 

मंत्री शंकरराव गडाख पोहोचले शेतकर्यांच्या बांधावर

संटकाळात सरकार पाठीशी असल्याची शेतकरयांना ग्वाहीनगर : राज्याचे जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन धीर दिला. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासह संपूर्ण सरकार आपल्या सोबत  असून एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहिला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत दिली गेली पाहिजे यासाठी प्रशासनाने सरसकट पंचनामे करावे असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी, महसूल , कृषी असे संबधीत अधिकारी राजेगाव तालुका लोहारा येथे बोलावून घेतले व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली . 

यावेळीं खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post