बीग बी अमिताभ बच्चन यांचा मोठा संकल्प, हिरवी रिबन लावून केली ....




बीग बी अमिताभ बच्चन यांचा मोठा संकल्प, हिरवी रिबन लावून केली अवयवदानाची घोषणा

मुंबई- अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्यांच्या कोटवर एक लहान हिरव्या रंगाची रिबन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले की, 'मी ऑर्गन डोनर होण्याची शपथ घेतली आहे. यासाठी मी हिरवी रिबन लावली आहे.'
अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी अवयव दानाची शपथ घेतल्याचा स्वत:चा अनुभव शेअर केला आहे, तर काहींनी त्यांचे सर्टिफिकेट देखील शेअर केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post