'ओबीसीं'चा शासकीय सेवेतील अनुशेष तातडीने भर

 महात्मा फुले समता परिषदेची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
     नगर - अखिल भारतीय महात्मा समात परिषदेच्यावतीने ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यातयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन निवेदन देण्यात आले.  याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगडजिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदेमहानगर अध्यक्ष दत्ता जाधवउपाध्यक्ष शरद कोकेसावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष अशोक तुपेसावता परिषद जिल्हाध्यक्ष निखिल शेलार आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीराज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रमाणात महाज्योती संस्थेकरीता निधी उपलब्ध करुन द्यावाराज्य मागासवर्ग आयोगावर ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात यावीशासकीय कर्मचार्यांच्या प्रलंबित पदोन्नत्ती बाबत निर्णय घ्यावाइमाव,विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित असूनती मिळावीइतर मागासवर्ग विकास महामंडळास वाढीव निधी उपलब्ध करुन द्यावामहामंडळामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांसाठी भागभांडवालात वाढ करण्यात यावीतसेच प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी एक  मुलींसाठी एक वसतीगृहे सुरु करावीतत्याचप्रमाणे इंग्रजी शाळेत प्रवेशाबाबत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावाराज्यात सावित्रीबाई फुले घरकुल योजना प्रभावीपणे राबवावीतसेच अर्थसंकल्पात ओबीसींच्या प्रमाणात तरतूद करण्यात यावीस्वतंत्र्य जनगणना व्हावीशासकीय सेवेतील अनुशेष तातडीने भरण्यात यावामराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करु नयेशासनाच्यावतीने भरती प्रक्रिया सुरु ठेवावीवसतिगृहाचा लाभ  मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार निधी देण्यात यावाआदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post