शरद पवार यांच्या हातातील 'त्या' माळेची सोशल मिडियात चर्चा
खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले महत्त्व
नगर : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. या दौर्यात पवारांच्या हातात असलेल्या एका विशिष्ट माळीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ही माळ कवड्यांची असून पवारांनी ती आपल्या हातात ठेवली असल्याचे फोटोही व्हायरल झाले आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनीही पवारांचा हातात माळ असलेला फोटो ट्विट करीत या माळेचे महत्त्व विशद केले आहे.
खा.कोल्हे यांनी सांगितले की,
ही हातातील माळ खूप काही सांगते...
हे प्रतीक आहे जिद्दीचं, विश्वासाचं, दिल्लीश्वराला आव्हानाचं, शून्यातून स्वराज्य निर्मिण्याचं, लोककल्याणाचं आणि रयतेच्या निर्व्याज प्रेमाचं!
Post a Comment