महानोकरीची संधी...महापारेषणमध्ये ८५०० तांत्रिक रिक्त पदे भरणार

 

महानोकरीची संधी...महापारेषणमध्ये ८५०० तांत्रिक रिक्त पदे भरणार



मुंबई : राज्यातील ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास 8500 तांत्रिक श्रेणीतील रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले. राज्यात वीज पारेषण कंपनीत तांत्रिक श्रेणीतील 8 हजार 500 पदांची ही भरती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे. यामुळे राज्यात मेगा-भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने हजारो तरुणांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.


तांत्रिक संवर्गातील 6750 पदे व अभियंता संवर्गातील 1762 पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत असल्याने बेकारीचे संकट झेलणाऱ्या हजारो तरुणांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत.


नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post