रोटरी कोविड सेंटरमध्ये रूग्ण सेवा करणार्या महिलांचा सन्मान

 


रोटरी कोविड सेंटरमध्ये रूग्ण सेवा करणार्या महिलांचा सन्मानअहमदनगर : महापालिका संचालित रोटरी कोविड केअर सेंटर मधून मागील ३ महिन्यात १५४० हून अधिक गरजू, गरीब रुग्णांनी विनामूल्य उपचार घेतले. 

नगर शहरातील पाचही रोटरी क्लबने एकत्र येऊन सुरू केलेल्या या शहरातील सर्वात मोठ्या आरोग्यसेवा केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी, सिस्टर, नर्सेस यांनी मागील ७२ दिवसांपासून २४ तास ड्युटी करत या सेंटरला रुग्णसेवा केली. जेव्हा शहरातील सर्वसामान्य लोक कोरोनाला घाबरून जगत होती, तेव्हा हे असामान्य आरोग्य कर्मचारी १२० बेडच्या आरोग्य केंद्रात कोरोना रुग्णांना सेवा देत होत्या. आणि म्हणूनच नवरात्रीच्या निमित्ताने या स्त्रियांच्या कार्याचे कौतुक म्हणून आणि खऱ्या कोरोना योद्धा म्हणून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊनच्या वतीने या महापालिका कर्मचाऱ्यांचा साडी आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आल, अशी माहिती मधुरा झावरे यांनी दिली. 

   दुर्गेने महिषासुराचा वध केला त्याच प्रमाणे या कोरोना आजाराशी लढताना, सेवा देताना प्रसंगी आपले कुटुंब, आपला संसार बाजूला ठेऊन  कोविड सेंटर वर हजारो रुग्णांची सेवा देणाऱ्या या आरोग्य सेविका आजच्या काळातील दुर्गेचे रूपच असल्याची भावना यावेळी अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी व्यक्त केली. 

या सेंटर मध्ये काम करत असताना या आरोग्य सेविकांपैकी २ जणी स्वतः कोरोना बाधित झाल्या तरी त्यांनी त्यांची जबाबदारी न सोडता हे सेवा सुरूच ठेवली. त्यांचे आपल्या समाजासाठी, शहरासाठी असलेले योगदान खूप मोठे असल्याची भावना यावेळी ए.जी. मनीष बोरा यांनी व्यक्त केली.

 याप्रसंगी डॉ.पद्मजा गरुड, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. आदिती पानसंबळ, डॉ. सोनल बोरुडे, डॉ. अजित चोभे, अभय राजे, उज्वला राजे, श्रेया खाजगीवाले, मीनल बोरा, श्रद्धा इंगळे, संजीवनी इंगळे, कल्पना गांधी, किरण कालरा, नयना मुथा, वैशाली कराळे, संजीवनी इंगळे, पल्लवी इंगळे, सविता देशमुख आदी रोटरी महिला सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव दिगंबर रोकडे, नयना मुथा, तुषार चोरडिया यांनी परिश्रम घेतले.

आभार सौ. ज्योती रोकडे यांनी मानले. अशी माहिती सौ. उज्वला राजे यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post