घर घर लंगरसेवेच्या 'या' काढ्याने वाढवली 'इम्युनिटी'

 घर घर लंगरसेवेच्या 'या' काढ्याने वाढवली 'इम्युनिटी'

  70 दिवसांपासून रोज सुमारे ४ हजार नागरिक घेतात लाभ
अहमदनगर (प्रतिनिधी)- टाळेबंदी काळात गरजूंना जेवण पुरविण्यासाठी सुरु झालेल्या घर घर लंगरसेवेच्या वतीने शहरातील कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या युनानी काढा वाटपाला 70 दिवस पुर्ण झाले असल्याची माहिती हरजितसिंह वधवा यांनी दिली. अहमदनगर पोलीस दल, लायन्स क्लब अहमदनगर आणि अहमदनगर प्राईड यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या या काढा वाटप उपक्रमास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शहरात दोन महिन्यापुर्वी कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली होती. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घर घर लंगरसेवेच्या वतीने नागरिकांना सकाळी विविध भागात युनानी काढा वाटपाची सुरुवात 10 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आली होती. लंगरसेवेच्या वतीने दररोज सकाळी प्रोफेसर कॉलनी चौक, आनंदधाम, तारकपूर, मंगल गेट, भिंगार, पारिजात चौक, गोविंदपुरा, पंजाबी कॉलनी, आलमगीर चौक, चितळे रोड, माळीवाडा, गुरु अर्जुन देव कोवीड सेंटर, आनंदऋषीजी हॉस्पिटल या ठिकाणी नागरिकांना मोफत काढा वाटण्यात येतो. 19 आयुर्वेदिक घटक यांचा मिश्रण असलेला युनानी काढा नागरिकांच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरला आहे. या उपक्रमास नागरिकांचा चागला प्रतिसाद लाभला. 30 लिटरपासून या काढा वाटपाची सुरुवात झाली. सध्या दररोज 200 लिटर काढा विविध भागात वाटप केले जाते. साधारण साडेतीन ते चार हजार लोक प्रतिदिवस या काढ्याचा लाभ घेत आहे. तर अनेक नागरिक घरच्यांसाठी देखील काढा बाटलीत घेऊन जातात. काढा वाटपाच्या सेवेसाठी हरजितसिंह वधवा, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, सुनील छाजेड, सनी वधवा, टोनी कुकरेजा, दीपक कुकरेजा, विपुल शहा, रामसिंग कथुरिया, सुनील थोरात, कैलाश नवलानी, बल्लू सचदेव, पुनीत भुटाणी, अमरजीतसिंग वधवा कार्यरत आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post