नगरमध्ये सुमारे साडेचार लाखांचा गांजा जप्त

 नगरमध्ये सुमारे साडेचार लाखांचा गांजा जप्तनगर : प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाने अहमदनगर शहरात छोटी ईमाम समोरील झोपडपटटीमध्ये छापा टाकून गांजाचा मोठा साठा जप्त केला आहे. विशेष पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. सुनिल सुर्यवंशी, कर्मचारी पोहेकॉ/डंगोरे, डहाळे, पोना भिंगारदिवे, धामणे, चव्हाण, /घुले, दिलीप गायकवाड,पवार,  घोडे, मपोकॉ  भिंगारदिवे यांचेसह तसेच म.न.पा.मधील कर्मचारी पंच यांना बरोबर घेवुन नमुद ठिकाणी दि.२०/१०/२०२० रोजी १५.०५ वाजता अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी ११.२१३ किलो ग्रॅम वजन गांजा (गांजा गुंगी आणणारा व नशा आणणारा पदार्थ ) याची सर्व मिळुन किंमत ४,४८,५२०/- रुपये असा मुद्देमाल व रोख रुपये ११२०/- असा एकुण ४,४९,६४०/- रुपये मुद्देमाल मिळुन आला.

याप्रकरणी आरोपी  सीराज नबाब शेख (वय ३२ वर्षे, रा.कोठला झोपडपटटी, अहमदनगर) याला ताब्यात घेऊन त्याचे विरूद्ध तोफखाना  पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे.  आरोपी अटक करुन मुद्देमाल पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post