धक्कादायक...मनपा आयुक्तांच्या दालनातच व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

 धक्कादायक...मनपा आयुक्तांच्या दालनातच व्यापाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

बाजार समितीतील गाळ्यांवर राजकीय आकसापोटी कारवाई होत असल्याचा आरोपनगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितेतील २८ गाळेधारक व व्यापारी यांच्यावर राजकीय आकसपोटी होणारी कारवाई थांबवावी, अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे
व्यापाऱ्यांवरही आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. ही सर्व जबाबदारी तक्रारदार व मनपा प्रशासनाची राहील. अशा आशयाचे निवेदन मनपा आयुक्त श्रीकांत
मायकलवार यांच्याकडे व्यापाऱ्यांनी आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन दिले. 
यावेळी एका व्यापाराने आयुक्तांसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी वेळीच त्याला रोखले.

निवेदनात म्हटले आहे की, सर्व व्यापारी वर्तमान पत्रातील गाळे पाडण्याची बातम्यांमधील मजकूर वाचला असता आमची गाळे पाडून टाकण्यात येणार असल्याचे आम्हाला कळाले, तक्रारदार अधिकारी समजून हातात टेप घेऊन बाजार समितीतील गाळ्यांची
मोजमाप करीत आहेत.तसेच व्यापाऱ्यांवर दहशत व दमदाटी करण्याचे काम सुरु आहे. तरी आम्ही सर्व व्यापारी सांगू इच्छितो की, ही सर्व गाळे रितसर व नियमानुसार
घेतलेले आहे. ही सर्व गाळे बाजार समितीच्या जागेवर आहे. बाजार समितीची गाळे भाडे कराराने देण्याबाबत जाहिरात दिली होती. सदर जाहिरात वाचून आम्ही बाजार
समितीकडे अर्ज करून डीडीआर समोर करारनामा करुन भाडे कराराने नियमानुसार घेतले आहे. सदर जागेचा आम्ही व्यवसायासाठी वापर करत असून कुठलाही
गैरप्रकार आम्ही करत नाही. असे असताना काही तक्रारदार यांच्या राजकारणापायी आम्हास वेठीस धरत असून, गाळे पाडण्याबाबत राजकीय दबाव आणत आहेत.
 वर्तमान पत्रात बातमी आल्यापासून आमच्या घरातील सर्वांची मानसिक अवस्था
जीवघेणी झाली आहे. वास्तविक यातील काही तक्रारादारांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व बेकायेशीर कामे आहेत. परंतु आम्ही यात पडणार नाही. वेळ आली तर
आम्ही यांची अतिक्रमणे काढण्याबाबात बेकायदेशीर कामे बंद करण्याबाबत उपोषणाला बसणार असून कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करु, या घटनेची सर्व
जबाबदारी तक्रारदार व मनपा प्रशासनाची राहील.


आयुक्त यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळास सांगितले आहे की, कुठल्याही खासगी व्यक्तीला गाळे मोजण्याचा अधिकार नाही, त्यांनी हे कृत्य करु नये.
कायदेशीर बाबीची तपासणी करूनच पुढील कारवाई केली जाईल. न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने कोविडच्या काळामध्ये ३१ ऑक्टोबर पर्यंत स्थगिती देण्यात
आलेली आहे. त्यामुळे कुठलीही कारवाई घाईघाईने केली जाणार नाही. सर्वांना विचारात घेऊनच पुढील कारवाई केली जाईल.

यावेळी आ. संग्राम जगताप, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, उबेद शेख, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, विपूल शेटीया, विनीत पाऊलबुद्धे,अभिजित खोसे, धनेश कोठारी, किरण दर्डा, सौरभ भळगट, भास्कर पवार, सुभाष सोनी, अजित कासलेवाल, आनंद चोपडा, राजेंद्र कोठारी, सूर्यकांत राका, विशाल दाभाडे, वैभव दाभाडे, नितीन शिंगवी, संग्राम सूर्यवंशी आदी व्यापारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post