विना परवाना फटाक्यांचा साठा, सुमारे ११ लाखांचा माल जप्त

 

विना परवाना फटाक्यांचा साठा, सुमारे ११ लाखांचा माल जप्त



नगर: स्फोटके (फटाके)खरेदी करुन गोडावुन नसताना ते विनापरवाना  बापु एकनाथ आमले ( रा. अरणगांव

शिवार शेती गट नं १९५ ) यांच्या जागेत साठवणुकीसाठी ठेवल्याने   फटाकेचे मालक दत्तात्रय गोरखनाथ वाबळे, (रा. पाईपलाईनरोड, प्रियदर्शनी हॉटेल जवळ अहमदनगर) व जागा मालक यांच्या वर कारवाई करण्यात आली आहे. दिनांक १६/१०/२०२० रोजी विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एच. सुर्यवंशी यांच्या टिमने ही कारवाई केली.

एकनाथ आमले यांच्या घरात लायसन्स व गोडाऊन नसताना स्फोटके ( फटाके) याचे कोणत्याही प्रकारचे बिले अगर पावत्या नसताना साठा केलेला असताना मिळुन आला आहे.

सदरची खबर प्राप्त होताच प्रभारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर  डॉ. दत्ताराम राठोड यांना माहीती देवुन त्यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक एस. एच. सुर्यवंशी व त्यांचे पथकातील कर्मचारी तसेच इतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व मपोकॉ  भिंगारदीवे यांनी मिळुन सदर ठिकाणी अचानक छापा घातला.

सदर घरामध्ये  खाक्या रंगाचे स्फोटके(फटाके ) असलेले एकुण १०९ बॉक्स त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत १० लाख ९० हजार रुपयेचा मुद्येमाल  मिळुन आला आहे.

सदर बाबत नगर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post