अभिनेत्री दीपाली सय्यद यांना फोनवरून धमकी, आरोपी अटकेत

 अभिनेत्री दीपाली सय्यद यांना फोनवरून धमकी, आरोपी अटकेतमुंबई :  अभिनेत्री दिपाली सय्यद यांना फोन करून धमकावणाऱ्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. संदीप वाघ असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो अहमदनगर येथे राहणारा आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना 4 ऑक्टोबर रोजी एका निनावी नंबरवरून फोन आला होता. फोन करून समोरच्याने दीपाली सय्यद यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. कार्यक्रमासाठी किती मानधन असेल याची बोलणी करत असताना समोरच्या व्यक्तीने दीपाली सय्यद यांना अश्लील भाषेत शिवीगाळ सुरू केली आणि आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच नगरला येऊनच दाखव,अशी धमकी सुद्धा दिली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post