टिव्ही पाहण्याच्या वादातून अल्पवयीन भावाकडून लहाण बहिणीचा खून

टिव्ही पाहण्याच्या वादातून अल्पवयीन भावाकडून लहाण बहिणीचा खून
नगर:  केडगाव मधील शाहूनगर  परिसरात एका मध्यमवर्गीय कुंटुबात टिव्ही पाहण्याच्या वादातुन मोठया अल्पवयीन भावाकडुन अल्पवयीन बहिणीची डोक्यात हातोडा मारून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी सायंकाळी ६ ते साडेसहा च्या दरम्यान आईवडिल घरात नसताना दोघा भाऊ बहिणीत टिव्ही पाहण्यावरून वाद झाला . यात अल्पवयीन मुलीचा ( वय ९ वर्ष) हिचा जागेवरच मृत्यु झाला . अल्पवयीन मोठा भाऊ  ( वय १४ वर्ष ) याच्यासोबत लहान बहिणीचे टिव्ही पाहण्यावरून वाद झाले . आई वडिल घरात नसताना त्यांचे वाद वाढले . यातुन मोठया भावाने लहान बहिणीच्या डोक्यात हातोडा मारला . त्यात तीचा जागेवरच जीव गेला . शेजारच्या घरातील लोकांना याची कुणकुण लागल्याने घटना उघडकीस आली ..कोतवाली पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले . 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post