तर 'या' महिन्यापर्यंत करोनाची साथ पूर्ण आटोक्यात येईल

 तर 'या' महिन्यापर्यंत करोनाची साथ पूर्ण आटोक्यात येईलनवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येने शिखर गाठण्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरत राहिल्यास 2021च्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत देशात करोना आटोक्यात येईल, असा अंदाज केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटताना दिसत आहे. .


आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक एम. विद्यासागर यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारने दहा शास्त्रज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीकडून कोरोनाच्या भारतातील प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यासाठी नवीन गणितीय प्रारूप  विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार भारतात सप्टेंबर महिन्यातच कोरोना प्रादुर्भावाने शिखर  गाठले होते. सप्टेंबरच्या मध्यात देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 10.17 लाख इतकी होती. परंतु, तोपर्यंत आपण वैद्यकीय सुविधा आणि चाचण्यांसह सर्व बाबतीत सक्षम झालो होतो. परिणामी गेल्या महिन्याभरात या संख्येत सातत्याने घट दिसून येत आहे. आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी ती हिवाळा आणि सणासुदीमुळे होईल, असे निरीक्षण या समितीने नोंदवले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post