काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर

 काँग्रेसची तालुका कार्यकारिणी जाहीर 

  आ. डॉ. सुधीर तांबे यांचे हस्ते नियुक्तीपत्राचे वाटपकर्जत ( प्रतिनिधी):- काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्याना आ सुधीर तांबे यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. 

                कर्जत तालुक्यात काँग्रेस पक्षाची मजबूत बांधणी करत आज कर्जत तालुका कार्यकरिणी जाहीर करण्यात आली असून यामधील विविध पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले तर जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, ज्ञानदेव वाफारे, 

यांची भाषणे झाली, यावेळी ऍड माणिकराव मोरे, ऍड कैलासराव शेवाळे, युवक काँग्रेस कर्जत जामखेडचे अध्यक्ष सचिन घुले तात्यासाहेब ढेरे, नंदकुमार भैलूमे, बापूसाहेब काळदाते, मिलिंद बागल, संतोष म्हेत्रे, ओंकार तोटे, भाऊसाहेब तोरडमल, माजिद पठाण, अमोल भगत, राम जहागीरदार,  उमेश गलांडे,  ज्ञानदेव गवते, योगेश भोईटे, उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आ. डॉ सुधीर तांबे यांनी कर्जत तालुक्यातील पक्षाच्या चढत्या आलेखाचे कौतुक करताना सर्वानी एकदिलाने काम केल्यास प्रत्येकाला त्याचा फायदा होईल असे म्हटले. तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची तालुका कार्यकारीनी जाहीर करून सर्वाना आ. डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले यामध्ये उपाध्यक्ष म्हणून संतोष भोसले, धनंजय खंडागळे, भाऊसाहेब शिंदे, विकास खराडे, दत्तात्रय गायकवाड, गोकुळ इरकर, सतीश थेटे पाटील, जनरल सेक्रेटरी म्हणून राहुल बाबर, किरण साळुंखे, जयेश टकले, जयदीप शिंदे, ईश्वर दळवी, विजय साळवे, जालिंदर माळी, सेक्रेटरी म्हणून शंकर जाधव, डॉ राजेंद्र निकत, नवनाथ आखाडे, संदीप सरकाळे, आप्पा तूर्कुंडे, योगेश अनभुले, नितीन लोंढे,  जॉईंट सेक्रेटरी म्हणून विनोद राऊत, दादा शेगडे, अण्णासाहेब ननवरे, अशोक साळुंखे, स्वप्नील कवळे, रामदास  अनभुले, शिवा काळे, गुलाब लोंढे, सुभाष निंभोरे, महेश म्हेत्रे, तर कार्यकारणी कार्यकारिणी सदस्य परशुराम शिंदे, अतुल सुरभुरे, राहुल चखाले, आप्पा रंधवे, भानाभाऊ ननवरे, अंबादास आखाडे, प्रकाश धांडे, आबा कदम, यांचे सह विविध विभाग सेलच्या तालुकाध्यक्षपदी अनेकांची निवड करण्यात आली असून यामध्ये अल्पसंख्यांक विभाग राजू बागवान अनुसूचित जाती विभाग अजय नंदकिशोर भैलुमे विधी विभाग ऍड संजीवन गायकवाड, आदिवासी काँग्रेस गणेश धुरे,  किसान व खेत मजूर काँग्रेस शिवाजी शिंदे, पर्यावरण विभाग योगेश पोपट खोसे, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग मयूर दिलीप काळदाते, सामाजिक न्याय विभाग संग्राम ढेरे, शेतीमाल व मार्केटिंग सेल विभाग संदीप पुराने, तर उच्च व तंत्रशिक्षण सेलच्या अध्यक्षपदी विष्णू डुबल यांची निवड करण्यात आली असून या सर्वांना आज नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post