फडणवीस बिहारमधून दिल्लीला गेले तर कदाचित मोदीही बाहेर पडतील

 

फडणवीस बिहारमधून दिल्लीला गेले तर कदाचित मोदीही बाहेर पडतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, केंद्रातील सरकार परदेशी नाही,  हक्काने मदत मागणार
सोलापूर : 'बिहारला गेलाच आहात तर पुढे दिल्ली जावे, निदान पंतप्रधान मोदी हे तरी बाहेर पडतील', असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूरमधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. 

कुणीही राजकीय चिखलफेक करण्याची गरज नाही. सध्या महाराष्ट्रावर मोठे संकट कोसळले आहे. पण, विरोधी पक्ष नेते हे बिहारला प्रचाराला जात आहे. देवेंद्र फडणवीस हे बिहारला प्रचाराला गेले, त्यांनी आता पुढे जाऊन दिल्लीला जावे, जर दिल्लीला गेले तर पंतप्रधान मोदी सुद्धा बाहेर पडतील, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.


'केंद्र सरकार हे काही परदेशातील सरकार नाही. पक्षपात न करता सर्व राज्यांना मदत करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारवर आहे. पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी माझ्याशी बोलले आहे. त्यामुळे काही मदत लागल्यास हक्काने मागणार आहे. ती मदत ते दिल्याशिवाय राहणार नाही' असंही ठाकरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post