माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार ह.भ.प. कृष्णराव रंधवे यांचे निधन

 

माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार ह.भ.प. कृष्णराव रंधवे यांचे निधनपुणे, दि.१६ :- पंढरपूरची वारी आणि वारकऱ्यांशी जिव्हाळ्याचे, अतूट नाते जपणारे, श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वंशपरंपरागत चोपदार ह.भ.प. कृष्णराव रंधवे तथा चोपदार गुरुजींच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे.

 

पंढरपूरच्या विठ्ठल माऊलींवर निस्सीम भक्ती आणि वारकरी संप्रदायाची पताका पुढे नेणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. पत्रकारिता आणि अध्यापनाच्या  माध्यमातून त्यांनी आपले वेगळेपण जपले. त्यांच्या निधनाने मूर्तीमंत चैतन्य हरपले आहे. त्यांचे निधन धक्कादायक असून वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. चोपदार गुरुजींच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post