'या' बॅंकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढ

 भूविकास बॅंकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेला मुदतवाढ
                                           

अहमदनगर दि. 23 :-  भूविकास बँकेची थकबाकी भरण्यासाठी राज्य सरकारचे वतीने शेतक-यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यात येत आहे. दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत या योजनेमध्ये सहभागी होऊन शेतक-यांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी त्वरीत भूविकास बँकेमध्ये भरावी आणि आपला 7/12 उतारा कोरा करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्थादिग्विजय आहेर यांनी केले आहे.

            महाराष्ट्र शासनाने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे. दीर्घ कालावधीपासून थकीत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा यासाठी या योजनेला दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देऊन योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

            एकरकमी कर्ज परतफेड योजना ही योजना थकबाकीदार शेतक-यांसाठी शेवटची संधी म्हणून राबविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्हा भूविकास बँकेचे सदर योजनेसाठी एकूण 315 सभासद एकरकमी कर्ज परतफेड योजनेसाठी पात्र असून या योजनेचा सर्वांनी फायदा घ्यावा. बँकेच्या थकबाकीदार 315सभासदांचा प्रचलित हिशोब साधारणपणे 616 लाख होत असून एकरकमी कर्ज परतफेड योजनेनुसार त्या सभासदांना 322 लाख एवढी रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजेच त्यावर सभासदांना 294 लाख एवढी भरघोस सवलत मिळणार आहे.

            तरी भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकरी सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांचेकडील थकबाकी संदर्भात बँकेच्या अहमदनगर येथील जुनी कोर्ट गल्ली, भूविकास भवन, पटवर्धन वाडा येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन एका पत्रकान्वये करण्यात आले आहेकार्यालयाचा दूरध्वनी 0241- 2345333

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post