ग्रामसेवा संदेश" 2020 दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा

 "ग्रामसेवा संदेश"  2020 दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा  नगर (सचिन कलमदाणे) :   साहित्य प्रकारातील कथा, कविता,  गझल, व्यंगचित्रे,  प्रवासवर्णन,  आदर्श गांव, शासनाचे विविध उपक्रम, व इतर अनेक उपक्रमांची रेलचेल असणारा व साहित्यिकांना कार्यक्रमाद्वारे भरपूर मानसन्मान देणारा  तसेच महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक गांवात, मंत्रालय व प्रत्येक जिल्हा परिषद येथे  पोहोचणारा एक अग्रगण्य दिवाळी अंक " ग्रामसेवा संदेश" हा १५ व्या  वर्षात पदार्पण करत आहे. साहित्यिकांच्या दृष्टीने  अभिमानाची बाब म्हणजे याच दिवाळी अंकाची मागील वर्षी अखिल भारतीय दिवाळी अंक  टॉप टेन  स्पर्धेत निवड ही झालेली आहे.

                       या  वर्षी "कोरोना साथीच्या" जागतिक आपत्तीमुळे  प्रचंड आर्थिक चणचण भासणार असल्याने अनेक  दिवाळी अंकाचे संपादक या वर्षी जाहिरातीच्या अभावी  दिवाळी अंक  काढण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे  साहित्यिक आपले साहित्य यावर्षी दिवाळी अंकात प्रकाशित करण्यास मुकणार आहेत.

                साहित्यिकांची ही अडचण "ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक तथा DNE 136  ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी दिवाळी अंक मीटिंगमध्ये ओळखली व खास साहित्यिकांसाठी या वर्षीचा "ग्रामसेवा संदेश" दिवाळी अंक काढण्याचे घोषित केले आहे.

                   आपले साहित्य आपण 22 /10/ 2020 पर्यंत gramsevasandesh@gmail.com  या मेलवर पाठवावे.  सोबत साहित्य स्वतःचे असल्याबाबतचे  हमीपत्र ही पाठवावे. दर्जेदार साहित्याचा समावेश निश्चितपणे "ग्रामसेवा संदेश" या दिवाळी अंकात केला जाईल. व कोरोना आपत्ती संपल्यानंतर  एका भरगच्च कार्यक्रमात "ग्रामसेवा  संदेश दिवाळी अंक 2019 व 2020 मधील   साहित्यिकांना कविसंमेलन भरवून  सन्मानीत ही केले जाईल.

                आपले  साहित्य पाठविल्यानंतर  9881085671 या मोबाईलवर संपर्क करावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना  DNE 136 चे राज्याध्यक्ष तथा "ग्रामसेवा संदेश" या दिवाळी अंकाचे संपादक श्री. एकनाथराव ढाकणे व सहसंपादक  लायन श्री राजेंद्र फंड यांनी केले आहे.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post